श्रीराम मंदिर भूमी पूजनाचे प.पू.जनार्दन हरीजी महाराजांना आमंत्रण
फैजपूर : अयोध्येत श्री राम मंदिराचे 5 ऑगस्ट 2020 रोजी भूमिपूजन होत असून आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील काही संतांना आमंत्रीत करण्यात आले आहे. यात फैजपूर येथील सतपंथ मंदिराचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज यांचाही समावेश आहे. परमपूज्य महामंडलेश्वर या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येला 2 ऑगस्ट रोजी जाणार आहे. तत्पूर्वी 1 ऑगस्टला ते चांगदेव येथील तापी-पूर्णा संगमावर जाऊन या पवित्र नद्यांचे जल आणून विधीवत पूजन करणार आहे. आणि ते पवित्र जल घेऊन अयोध्याला प्रस्थान करणार आहे, असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.

