भुसावळात धूम स्टाईल मोबाईल लांबवला
भुसावळ : धुम स्टाईल चोरट्यांनी मोबाईल लांबवल्याची घटना आरपीडी रस्त्यावर 2 रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. कमलेश यादव (समता नगर, भुसावळ) यांनी या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार दिली. 2 रोजी रात्री ते दुचाकीवरून घराकडे निघाले असता फोन आल्याने त्यांनी सात नंबर पोलिस चौकीजवळ रस्त्यावर दुचाकी लावून फोन उचलताच पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी काही कळण्याआत मोबाईल लांबवला. यादव यांनी आरडा-ओरड केली मात्र उपयोग झाला नाही. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

