वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा ; डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (सीआयएसपी) कार्यशाळा उत्साहात


जळगाव (गुरुवार 10 सप्टेंबर 2026) : डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, जळगाव येथे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) ‘एनएमसी अभ्यासक्रम अंमलबजावणी सहाय्य कार्यक्रम (सीआयएसपी)’ या दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. वैद्यकीय शिक्षणामध्ये क्षमता-आधारित वैद्यकीय शिक्षण (सीबीएमई) अभ्यासक्रमाची प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेत 27 प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

सीआयएसपी हा वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या क्षमता वृद्धीसाठी राबविण्यात येणारा महत्त्वपूर्ण प्राध्यापक विकास कार्यक्रम असून पारंपरिक अध्यापन पद्धतीऐवजी कौशल्याधारित, व्यावहारिक आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती विकसित करण्यावर भर देण्यात आला.कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, संचालक डॉ. नारायण आर्वीकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके आणि रजिस्ट्रार प्रमोद भिरूड,कार्यशाळेचे समन्वयक डॉ. अनंत बेंडाळे आणि राष्ट्रीय वैद्यकिय आयोगाच्या निरीक्षक डॉ. प्रेमा जोशी उपस्थीत होते.

कार्यशाळेत डॉ. माया आर्वीकर, डॉ. शुभांगी घुले, डॉ. दिलीप ढेकळे, डॉ. निलेश बेंडाळे, डॉ. सारंग दयाभाई, डॉ. बापुराव बिटे आणि डॉ. आलोक यादव यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.कार्यशाळेत पायाभूत अभ्यासक्रम, प्रारंभिक नैदानिक अनुभव, एकात्मिक अध्यापन, कौशल्य प्रशिक्षण, विद्यार्थी-डॉक्टर पद्धत तसेच मूल्यमापन पद्धती, लॉगबुक आणि ईपेार्टफोलीओ यांच्या प्रभावी अंमलबजावणीवर मार्गदर्शन करण्यात आले. ट्रेन द ट्रेनर या संकल्पनेतून प्राध्यापकांची अध्यापन क्षमता अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला.कार्यशाळेत 9 वक्ते, एक मुख्य अतिथी, 12 कॉलेज अतिथी, 27 प्राध्यापक, 20 कर्मचारी आणि सहा विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विविध अ‍ॅक्टिव्हिटीज, सखोल चर्चा आणि परस्पर संवादामुळे कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उइचए अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आणि वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !