मुंबईत पाऊस : तीन रेल्वे गाड्या रद्द
भुसावळ : मुंबईत मुसळधार पाऊस होत असलने रेल्वे प्रशासनाने तीन रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. मंगळवारी सुटणार्या कामायनी, एलटीटी-गोरखपूर तर गुरूवारची अप वाराणसी-एलटीटी या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बुधवारी सुटणारी पुष्पक एक्प्रेस ही गाडी मुंबई ऐवजी नाशिक येथून सुटणार आहे. मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने त्याचा थेट परीणाम रेल्वे गाड्यावर झाला आहे. मंगळवारी मुंबईतून सुटणार्या डाऊन कामायनी एक्स्प्रेस आणि एलटीटी गोरखपूर एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तर गुरूवार, 6 ऑगस्ट रोजी सुटणारी वाराणसी एलटीटी एक्स्प्रेस ही गाडी रद्द झाली आहे.ही गाडी भुसावळात शुक्रवारी येते, बुधवारी मुंबईतून सुटणारी पुष्पक एक्स्प्रेस ही गाडी मुंबई ऐवजी नाशिक रोड स्थानकावरून सुटणार आहे. ही गाडी शॉट टर्मिनेट करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबईतून येणार्या पुष्पक एक्स्प्रेस ही तब्बल सात तास तर पवन एक्स्प्रेस ही गाडी 1.20 मिनीटे विलंबाने धावत आहे.

