वरणगावातील वासुदेव नेत्रालयात रुग्णांना राम रक्षा भेट
श्री राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर डॉ.नि.तु.पाटील यांचा उपक्रम
वरणगाव : सुमारे 500 वर्षानंतर शरयू नदीकिनारी पावन अयोध्या नगरीत प्रभू श्री रामलल्ला मंदिराचा भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी झाल्यानंतर वरणगावातील वासुदेव नेत्रालयात येणार्या सर्व रुग्णांना सकाळी दहा ते सहा या ओपीडीच्या वेळेत डॉ.नि.तु.पाटील यांच्यातर्फे श्री रामरक्षा भेट देण्यात आली तसेच बुधवारी दिवसभर नेत्रालयात मधुर स्वरात श्री रामरक्षाचे श्रवण करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कपिल राणे, दीपक फेगडे, अंकुश गवळी, आमीन शेख, राहुल कोचुरे आदींची उपस्थिती होती.


