धक्कादायक ! माजी मंत्री एकनाथराव खडसेंना महावितरणने दिले लाखांचे वीज बिल


मुक्ताईनगर : लॉकडाऊनमध्ये अव्वाच्चा सव्वा वीज बिल देवून महावितरणने सर्वसामान्यांना शॉक दिला असतानाच त्यात आता राजकारणीही सुटले नसल्याचे समोर आले आहे. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना एक लाख चार हजारांचे वीज बिल पाठवून महावितरणने पुन्हा आपल्या कारभाराचा प्रत्यत दिला आहे. नागरीकांना येणार्‍या भरमसाठ वीज बिलावर तोडगा काढण्यासाठी राज्यसरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. खडसे यांचे मुक्ताईनगरमध्ये घर असून खडसेंना एप्रिल ते जुलै या महिन्याचं 1 लाख चार हजारांचे वीज बिल पाठवलं आहे. प्रचंड प्रमाणात बिल आल्याने खडसे चांगलेच संतापले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !