देवळाली-दानापूर किसान पार्सल एक्स्प्रेसचा शुभारंभ


भुसावळ : देवळाली-दानापूर दरम्यान धावणार्‍या किसान पार्सल एक्स्प्रेसचा शुक्रवारी ऑनलाईन व्हिडिओ लिंकद्वारे कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल अध्यक्षतेस्थानी होते. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, रावसाहेब दानवे, कृषी एवं किसान कल्याण मंत्री पुरूषोत्तम रुपाला, कैलास चौधरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, डॉ.भारती पवार, सरोज अहिरे आदींची उपस्थिती होती. मध्य रेल्वे महा प्रबंधक संजीव मित्तल, भुसावळ डीआरएम विवेककुमार गुप्ता, देवलाली स्टेशन येथे अपर मंडळ रेल प्रबंधक मनोज सिन्हा उपस्थित होते. वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, वरीष्ठ मंडळ परीचालन प्रबंधक आर.के.शर्मा, आणि सर्व शाखांचे अधिकारी (व्हिडिओ लिंकद्वारे) उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !