श्रमदानातून केली जिल्हा परीषद शाळेची साफसफाई


निमखेडी बुद्रुक येथील विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

मुक्ताईनगर : ‘माझी शाळा’ या संकल्पाने प्रेरीत होत तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील जय म्हसोबा बहुउद्देशीय संस्था तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने युवकांनी पुढाकार घेत शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपली जिल्हा परीषद शाळेची साफसफाई करून समाजात एक आदर्श निर्माण केला. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे जिल्हा परीषद शाळा, निमखेडी बुद्रुक येथील आवार झाडे-झुडूपे व गवत वाढल्यामुळे अस्वच्छ झाले होते. ते बघून इच्छापुर येथील ज्ञानपूर्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक विनायक वाडेकर यांनी निमखेडी येथील आपल्या काही विद्यार्थ्यांना बोलावून घेतले. आणि शाळा साफसफाईची संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली.

यांचा उपक्रमात सहभाग
निमखेडी गावातील विशाल नारखेडे, स्वप्निल चोपडे, महादेव वराडे, हरी पाटील, अमोल कांडेलकर, महादेव भोंगर, वैभव तायडे, निखील चोपडे, योगेश खांजोडे, वैभव भंगाळे, सुबोध इंगळे, संदीप संभारे, राहुल इंगळे, शंकर तायडे, अरुण सोनवणे, संतोष पाटील, स्वप्नील चोपडे, मुकेश कांडेलकर या युवकांनी स्वतः कुदळ फावडे तसेच टिलर आणून संपूर्ण शाळेच्या आवारातील वाढलेले गवत तसेच झाडेझुडपे कापून साफसफाई केली. एवढेच नव्हे तर झाडून पूर्ण परीसर स्वच्छ केला. याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष राजू कांडेलकर, मुख्याध्यापक भटू वाडीले, किशोर सुलताने, राहुल ठवरे, सुधीर मांजरे, विनायक वाडेकर हे प्रमुख उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !