कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कुर्‍हेपानाचे गावात निर्जंतुकीकरण


भुसावळ : तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले. याकामी नगरसेवक पिंटू ठाकूर यांचे सहकार्य लाभले.

कोरोना संसर्ग न वाढण्यासाठी दखल
शहर व तालुक्यात कोरोनाने कहर केला असून कुर्‍हे येथे जुलै महिन्यापर्यंत एकही रुग्ण नसला तरी जुलै महिन्यातील मध्यंतरीच्या काळात व 3 ऑगस्ट पर्यंत सात रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले. यातील तीन रुग्ण सुधारले असून ते घरी आले आहेत तर चार रुग्णांवर उपचार सुरू आहे. कोरोणाचा संसर्ग वाढू नये यासाठी येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील व मित्र मंडळींनी यापूर्वी तीन दिवस गाव बंद ठेवण्याचे आवाहन केले होते व गावात रोग प्रतिकार शक्ती वाढवणार्‍या गोळ्यांचे वाटप केले होते. पुन्हा रुग्ण सापडल्यामुळे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील, पत्रकार उत्तम काळे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जितेंद्र नागपुरे, राजू भगत, एकनाथ धांडे, संजय कोळी, राहुल पाटील, प्रदीप शिंदे, अमोल पाटील, बापू भागवत शिंदे, पद्माकर पाटील, अजय कोळी, राहुल पाटील, कृष्णा सूर्यवंशी, सोमनाथ मस्के, वाल्मीक अहिर व मित्रमंडळातर्फे गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !