अत्यावश्यक साधन सामुग्री वाहण्यासाठी विशेष पार्सल गाडी
भुसावळ : रेल प्रशासनाद्वारे आवश्यक साधन सामुग्रीचे वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाडी चालवण्यात येणार आहे. नागरीकांनी काही सामुग्री पाठवयाची असेल त्यांनी आपल्या जवळपासच्या स्टेशनमधील मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
भुसावळ-चांगसरी पार्सल गाडी
गाडी क्रमांक 00139 भुसावळ-चांगसरी दरम्यान विशेष पार्सल गाडी 4 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता भुसावळ स्थानकावर सुटल्यानंतर तिसर्या दिवशी चांगसरीला नऊ वाजता पोहोचणार आहे. डाऊन दिशेला नागपूर, दुर्ग, बिलासपुर, झारसुगडा, टाटानगर, दानकुनी, खरगपूर, मालदा टाउन, न्यू जलपाई गुडी, न्यू बोंगाईगांव या स्थानकावर या गाडीला थांबा देण्यात आला आहे. गाडी क्रमांक 00140 चांगसरी-भुसावळ दरम्यान विशेष पार्सल गाडी ही 6 सप्टेंबर रात्री 11.30 वाजता चांगसरी स्थानकावरून सुटल्यानंतर तिसर्या दिवशी भुसावळ येथे 11.20 वाजता पोहोचणार आहे. अप दिशेला या गाडीला न्यू बोंगाईगांव, न्यू जलपाई गुडी, मालदा टाउन, खरगपूर, दानकुनी, टाटानगर, झारसुगड़ा, बिलासपुर, दुर्ग, नागपूर व भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.


