धक्कादायक ! : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 1063 रुग्ण आढळले
जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 30 हजार 749 वर : 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल 1063 कोरोनाबाधीत आढळल्याने खळबळ उडाली असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 30 हजार 749 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील मृतांची संख्या 849 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 21 हजार 845 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 369
जळगाव ग्रामीण 84
भुसावळ 31
अमळनेर 99
चोपडा 67
पाचोरा 46
भडगाव 31
धरणगाव 22
यावल 11
एरंडोल 77
जामनेर 50
रावेर 19
पारोळा 17
चाळीसगाव 81
मुक्ताईनगर 25
बोदवड 19
अन्य जिल्हा 15


