यावल तालुका निरीक्षकपदी विवेक नरवाडे
भुसावळ : जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची यावल तालुका निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप भैय्या पाटील यांनी ही निवड केली.
यांच्या उपस्थितीत दिले नियुक्तीपत्र
जळगाव काँग्रेस भवनात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व जळगाव जिल्हा प्रभारी प्रकाश मुगदीया, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप भैय्या पाटील यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डी.जी.भाऊसाहेब, जळगाव जिल्हा परीषदेचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे, प्रदेश काँग्रेसचे अविनाश भालेराव, प्रदीप भैय्या पवार, काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज सोनवणे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्रजी मराठे यांची उपस्थिती होती. निवडीनंतर नरवाडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


