भुसावळातील रेल्वे प्रवाशास मोबाईल केला परत


भुसावळ : रेल्वे प्रवासात मोबाईल चोरी झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त केला व 14 रोजी न्यायालयाच्या आदेशाने तो तक्रारदाराला परत करण्यात आला. झाले असे की, तक्रारदार अतुल बठेजा (आदर्श कॉलनी, सिंधी कॉलनी, भुसावळ) हे अहमदाबाद-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या कोच चार व बर्थ क्रमांक 56 वरून प्रवास करीत असताना चोरट्याने 30 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन पाटील व जगदीश ठाकूर यांनी आरोपी विनोद मोरेश्‍वर एडकी (खालचे गाव, ब्रह्मटेक, शिरपूर) यास अटक केली. आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला मोबाईल 14 रोजी न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदाराला परत करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !