अल्पवयीन बालिकेवर अत्याचार : आरोपीला 19 पर्यंत पोलिस कोठडी


भुसावळ : तालुक्यातील वांजोळा येथे साडेसहा वर्षीय मुकबधीर अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. या प्रकरणी आरोपी मंगल सीताराम भील (35, वांजोळा) यास अटक करण्यात आली होती. आरोपीला गुरुवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यास 19 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बुधवारी आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक रुपाली चव्हाण करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !