अन्याय झाला तर मार्ग निघाला असता, पक्ष सोडण्यााची गरज नव्हती !
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील : पक्ष प्रवेशानंतर खडसेंना लिमलेटची गोळी मिळणार की कॅडबरी ?
मुंबई : माजी मंत्री एकनाथराव खडसेंवर भाजपामध्ये अन्याय झाला असेल तर त्यावर काहीतरी मार्ग काढता आला असता. पण, त्यासाठी पक्ष सोडण्याची गरज नव्हती, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हणज माजी मंत्री एकनाथ खडसेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, एकनाथ खडसेंच्या समाधानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता त्यांना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, खडसे यांचा दुपारी दोन वाजता प्रवेशाचा कार्यक्रम ठरला होता मग तो दुपारी चारपर्यंत का लांबला, हे जयंत पाटील यांनी सांगावे. नाथाभाऊंना काय द्यायचं, हे ठरलं नाही. तुमचे समाधान होईल असे देऊ एवढ्यावर शेवटी नाथाभाऊ बळंबळं नरीमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. एकट्या देवेंद्र फडणवीस यांना नाथाभाऊंनी टार्गेट करणे बरोबर नाही. भाजपाचे निर्णय सामूहिक असतात. त्यामुळे त्यांनी फडणवीसांवर टीका करणे योग्य वाटत नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
