वरणगाव फॅक्टरी महाप्रबंधकांची कानपुरात बदली


भुसावळ : तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माणी महाप्रबंधक एस. चटर्जी यांची कानपूर येथे प्रशासनिक कारणावरून बदली झाली असून त्यांनी शनिवारी पदभार सोडला. गेल्यान तीन वर्षांपूर्वी वरणगावात रूजू झालेल्या चटर्जी यांच्या कार्यकाळात उत्पादन वाढ, गुणवत्ता, पर्यावरण रक्षण, नवीन उत्पादन आदी बाबींना महत्व देण्यात आले होते शिवाय कामगार संघटनांशी सौहार्दपूर्ण संबध ठेवून त्यांनी संवाद, मन की बात, आदी उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्यांच्या कार्यकाळात वरणगांव फॅक्टरीला विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले. फॅक्टरीमधील प्रत्येक विभाग, विविध कामगार संघटना, असोशिएशनने त्यांना शनिवारी प्रेमाचा निरोप दिला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !