त्याग, समर्पण व पायाला भिंगरी असलेल्या कार्यकर्त्याचा सर्वसामान्यांशी चांगला संवाद


भाजपा जिल्हाध्यक्ष राजु मामा भोळे : वरणगावात कार्यकर्ता अभ्यासवर्ग

भुसावळ : कुठल्याही कार्यकर्त्यात त्याग, सेवा, समर्पणाची भावना तसेच तोंडात साखर तसेच पायाला भिंगरी असली की त्याला सर्वसामान्य माणसांशी चांगला संवाद साधला येतो. भाजपाची राष्ट्रनिर्माण करण्यासोबतच सर्व समाजाला सोबत घेवून चालण्याची भूमिका आहे मात्र एखाद्या व्यक्तीचे चुकले असेल मात्र त्याचा राग पक्षावर काढू नका. बिहारच्या निवडणुकीत महिलांनी परीवर्तन घडून आणल्याने पक्षात महिलांचा सहभाग वाढणे गरजेचे आहे. दैनंदिन जीवनात वावरत असताना समाजाच्या गरजा ओळखता आल्या पाहिजे. अभ्यासवर्गातून या सर्व गोष्टींचा अभ्यास करून एक सच्चा कार्यकर्ता म्हणून समाजात जाण्याचे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजु मामा भोळे यांनी केले. वरणगाव येील नागेश्‍वर मंदिरावर आयोजित कार्यकर्ता अभ्यासवर्गात मार्गदर्शनप्रसंगी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
वरणगावातील अभ्यासवर्गात खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे, वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भुसावळ पंचायत समिती सभापती मनीषा पाटील, सदस्य प्रीती पाटील, वंदना उन्हाळे, जळगाव जिल्हा परीषदेचे माजी शिक्षण सभापती पोपट भोळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील आदी उपस्थित होते.

पक्ष संघटनावर भर : खासदार खडसे
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, विचारधारा कोणतीही असो राजकीय पक्षांमध्ये नवे कार्यकर्ते मिळविण्याची व त्यांना प्रशिक्षित करण्याची व्यवस्था असावी लागते. भाजपचे यश हे गावापासून दिल्लीपर्यंत कार्यरत असलेले विविध क्षेत्रांतील, जाती-समुदायांतील लाखो कार्यकर्त्यांमुळे आहे. येत्या काळात अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत अधिक यश मिळवण्यासाठी कार्यकर्ते मिळविणे, संघटन बांधणी करणे, लोकसंपर्क वाढविणे यावर भर द्यावा लागणार आहे. कार्यकर्त्याला एक समर्थ नेता म्हणून घडविण्याची प्रक्रिया भाजपच्या वतीने गेली अनेक वर्षे राबविली जात असल्याचेही त्या म्हणाल्या.

राज्यातील आघाडी सरकारने कोणतेही चांगले निर्णय घेतले नाही
आमदार संजय सावकारे म्हणाले की, देशभरात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून देशातील समस्या निकाला निघाल्या मात्र राज्यात आघाडी सरकारने कोणतेही चांगले निर्णय घेतलेले नाही. कोरोनाच्या नावाखाली सर्व काही लपवले जात आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशन असते. मात्र अधिवेशन्रदेखील चालत नाही. संघटन चालवणे सोपे असते मात्र राज्य चालवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याची प्रचीती आघाडी सरकारला आली आहे. कोरानाच्या काळात दिलासा मिळण्याऐवजी शासनाने वीज बिलाचे दर वाढविले आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. ज्यांना पक्षाची विचार धारा समजली तो कोणत्याही संकटात पक्षाची साथ सोडत नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावर डॉ.अतुल सरोदे, ‘पक्षाची कार्यपध्दत’ी या विषयावर जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, ‘व्यक्तीमत्व विकासावर’ आमदार स्मिता वाघ यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

उद्या शिबिराचा समारोप
रविवारी दुसर्‍या दिवसाचे उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्ते जयंतीलाल सुराणा, आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत होईल. सोशल मीडीया या विषयावर डॉ.राधेश्याम चौधरी, मागील सहा वर्षातील अंत्योदय संदर्भिय प्रयत्न या विषयावर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती पोपट भोळे, 2014 नंतर भारतीय राजकारणातील बदल या विषयावर उदय भालेराव, भारताचा इतिहास व विकास या विषयावर अजय भोळे, आपला विचार आपला परीवर या विषयावर प्रशांत देवरे मार्गदर्शन करतील. माजी मंत्री गिरीष महाजन, खासदार रक्षा खडसे, जिल्हाध्यक्ष राजू भोळे, आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत या अभ्यास वर्गाचा समारोप होणार आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी भुसावळ शहर सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन, निखील वायकोळे, विनीत हंबर्डीकर, प्रथम बुंदेले, अनिरुध्द कुलकर्णी, नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, संतोष बारसे, गिरीश महाजन, निक्की बतरा, राजेंद्र नाटकर, परीक्षीत बर्हाटे, अर्जुन खरारे, वासु बोंडे, विशाल जंगले, नागेश खरारे, प्रवीण इखणकर, खुशाल जोशी, शिशिर जावळे, गिरीश पाटील, किरण सरोदे, राजेश पाटील, मंगेश पाटील, नरेंद्र बर्‍हाटे, डॉ.नि.तु.पाटील, दिनेश दुधानी, महेश मेहरानी, प्रा.प्रशांत पाटील, गौरव लोणारी, राहुल तायडे, संदीप सुरवाडे, चेतन बोरोले, नंदकिशोर बडगुजर आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !