जुक्टो संघटनेच्या नूतन अध्यक्षपदी प्रा.सुनील सोनार


भुसावळ : जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची जिल्हा पदाधिकार्‍यांची सभा नाशिक विभागाचे अध्यक्ष प्रा.बी.ए.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून प्रा.सुनील सोनार यांची निवड करण्यात आली तर सचिवपदी प्रा.शैलेश राणे, कार्याध्यक्ष प्रा.नंदन वळींकर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली

विविध विषयांवर चर्चा
सभेत जुक्टो संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड, माजी अध्यक्ष प्रा.डी.डी.पाटील यांनी सभेला उद्देशून अनमोल मार्गदर्शन केले. मागील सभेच्या इतिवृत्त संघटनेचे सचिव प्रा.नंदन वळींकार यांनी वाचून दाखविले. संघटनेचा वर्षभरातील कामकाजाचा आढावा, आर्थिक खर्चास मंजुरी इत्यादी विषयावर चर्चा झाली. संघटनेच्या कामकाजाच्या आढाव्यात राष्ट्रीयीकृत बँकेतून पगार व्हावा, डीसीपीएस धारकांच्या पीएफ पावती संदर्भात चर्चा करण्यात आली. वेतन अधीक्षक यांच्याकडे वर्षभरातील पीएफच्या पावत्या संदर्भात मागणीची पूर्तता करावी याबाबत चर्चा करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
या सभेला जळगाव जिल्ह्यातील कार्यकारीणीचे पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र तायडे, प्रा.जी.एच.वंजारी, प्रा.अतुल इंगळे, प्रा.पी.पी.पाटील, प्रा.शरद पाटील, प्रा.राजेश भटनागर, प्रा.राजेश बडगुजर, प्रा.जितेंद्र पाटील, सहसचिव प्रा.डी.डी.भोसले, प्रा.रुबाब तडवी, प्रा.संदीप पाटील (चोपडा), प्रा.अनिल सोनवणे, प्रा.संदीप पाटील (पारोळा), प्रा.धनराज भारुडे, प्रा.एस.झेड.पाटील, प्रा.संजय चौधरी, प्रा.रुबाब तडवी, महिला प्रतिनिधी प्रा.रेखा पवार, क्रीडा प्रतिनिधी प्रा.मनोज वारके उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !