भुसावळ विभागातील सात गाड्यांच्या थांब्यात बदल


भुसावळ : भुसावळ विभागातून धावणार्‍या सात गाड्यांच्या थांब्यात बदल करण्यात आला असून रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

या गाड्यांच्या थांब्यात बदल
डाऊन 01071 लोकमान्य टिळक-वाराणसी विशेष गाडी 1 डिसेंबरपूसन लासलगाव, नांदगाव, नेपानगर या स्थानकावर थांबणार नाही. डाऊन 01093/02193 डाऊन मुंबई-वाराणसी ही गाडी 1 डिसेंबरपासून नांदगाव, रावेर, नेपानगर स्टेशनवर थांबणार नाही. डाऊन 03202 लोकमान्य टिळक टर्मिनस-पटना विशेष एक्स्प्रेस 6 डिसेंबरपासून देवळाली, लासलगाव, नांदगाव, नेपानगर स्थानकावर थांबणार नाही. डाऊन 01077 पुणे-जम्मूतवी विशेष गाडी 1 डिसेंबरपासून नांदगाव स्थानकावर थांबणार नाही. डाऊन 01039 डाऊन कोल्हापूर-गोंदिया विशेष गाडी 1 डिसेंबरपासून जलंब स्थानकावर थांबणार नाही. अप 01418/02042 अप नागपूर-पुणे विशेष गाडी 1 डिसेंबरपासून चाळीसगाव या स्टेशनवर थांबणार नाही. डाऊन 02223 डाऊन पुणे-अजनी विशेष गाडी 1 डिसेंबरपासून नांदुरा स्थानकावर थांबणार नाही.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !