रावेर शहरात रथोत्सवाचा श्रीगणेशा


रावेर शहरात कोरोनामुळे यंदा मिरवणूक केली रद्द : जागेवरच पाच पावले ओढणार रथ

रावेर : सुमारे 182 वर्षांची रथोत्सवाची परंपरा यंदाही कायम शहरातील श्री क्षेत्र दत्त मंदिरातर्फे शनिवारी शहरातील देवदेवता व संतांच्या समधीस्थळी जाऊन या उत्सवाचे निमंत्रण देण्यात आले. राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून 182 वर्षांपूर्वी श्री सद्गुरू सच्चीदानंद महाराज (श्री गुरुदत्त) यांनी मुस्लिम समाजाचे संत हजरत मस्तानशाह अली बाबांच्या दर्ग्यावर जाऊन निमंत्रण देण्याची परंपरा शनिवारी दत्त मंदिर व भविकांतर्फे पार पाडण्यात आली व सात दिवसांच्या रथोत्सवाचा श्रीगणेशा करण्यात आला.

मस्तान शाहवली दर्ग्यावर निमंत्रण
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने उत्सव, यात्रांवर निर्बंध घालण्यात आले असून दरवर्षी येथे मोठया उत्साहात व भक्तिमय वातावरणात होणारा यंदाचा रथोत्सव व त्यानिमित्ताने असलेली यात्रा भरवण्यावर निर्बंध घालण्यात आहेत मात्र या उत्सवाची 183 वर्षांची परंपरा खंडित होऊ नये यासाठी दत्त मंदिर संस्थान व भाविकांतर्फे उत्सवाची तयारी सुरू करण्यात आली आहे. शनिवारी येथील हजरत मस्तान शाहवली दर्ग्यावर मंदिरातर्फे श्रीरंग कुलकर्णी, ऋषिकेश कुलकर्णी, पद्माकर महाजन, सुनील अग्रवाल, कांतीलाल महाजन, कपिल दुबे, उमेश वाणी, सुधीर डहाळे, नितीन पाटील, यांनी जाऊन दर्शन घेतले. यावेळी या संतांना निमंत्रण देण्यात आले. दत्तमंदिर संस्थांचे निमंत्रण दर्ग्याचे मौलाना सोयब यांच्या सह नगरसेवक सादिक शेख, अय्युब खान, शेख गयास, युसुफखा, असदुल्ला खान, सैय्यद आरीफ, इम्रान खान यांनी निमंत्रण स्वीकारले.


असा आहे परंपरेचा इतिहास
मुस्लिम समाजातील येथील संत हजरत मस्तान शाहवली हयात असताना दत्त मंदिरातर्फे त्यांना रथोत्सवाचे निमंत्रण दिले जात होते. या उत्सवात ते स्वतः सहभागी होत असत त्यामुळे दत्त मंदिरातर्फे निमंत्रण देण्याची शेकडो वर्षांची परंपरा यंदाही जपण्यात आली.

पालखी मिरवणूकही रद्द
रथ ओढण्याची व मिरवणुकीची 182 वर्षांची परंपरा कायम ठेवण्यासाठी दत्त मंदिरातर्फे यंदा मंदिराजवळच रथाची महापूजा करण्यात येईल. यानंतर रथ पाच पावले ओढण्यात येईल मात्र शहरातून रथ किंवा पालखीची मिरवणूक काढली जाणार नाही.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !