लग्नाची गळ घालत महिला शिक्षिकेचा विनयभंग : अमळनेर शहरातील प्रकार
अमळनेर (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : शिक्षिकेचा मार्ग अडवत तिला लग्नासाठी गळ घालण्यात आली व अश्लील वर्तन करीत विनयभंग करण्यात आला. ही घटना शहरातील मंगळग्रह मंदिराच्या पार्किंग समोरील रस्त्यावर 1 रोजी घडली. या प्रकरणी हिरालाल ज्ञानेश्वर रायसिंग (जळोद) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
पीडीत शिक्षिका आपल्या सहकार्यांसह 1 रोजी पावणे तीन वाजेच्या सुमारास दुचाकीवरून मंगळग्रह मंदिराच्या पार्किंग समोरून रस्त्याने जात असताना जळोद येथील हिरालाल ज्ञानेश्वर रायसिंग याने दुचाकी अडवत महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याचा व लग्न करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. महिला शिक्षिकेने अमळनेर पोलीस स्टेशनला आरोपीविरोधात तक्रार दिल्यावरून गुन्ह दाखल करण्यात आला. तपास हवालदार गणेश पाटील करीत आहेत.


