दुचाकी चोरटा रावेर पोलिसांच्या जाळ्यात


रावेर : दुचाकी चोरी करून तिची कमी किंमतीत विक्री केल्याप्रकरणी दुचाकी चोरट्यासह चोरीची दुचाकी खरेदी करणार्‍याला रावेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तक्रारदार शेख आसीफ शेख सुभान (24, नेहता, ता.रावेर, हल्ली मुक्काम मदिना कॉलनी, रावेर) हे एकता दूध डेअरीत कामाला आहेत. 19 रोजी त्यांची दुचाकी (एम.एच.19 आर.5908) ही एकता दूध डेअरीमागे लावल्यानंतर अज्ञात चोरट्याने ती लांबवली होती व या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गोपनीय माहितीवरून दुचाकी चोरी केल्याप्रकरणी अब्दुल जुबेर अब्दुल रौफ (रा.गौसीया मशीद, बंडू चौक, रावेर) यास अटक केली. पोलिस चौकशीत आरोपी ही दुचाकी रसलपूर येथील शे.सादीक निसार कुरेशी यास अवघ्या तीन हजार रुपयात विकल्याची कबुली दिल्यानंतर शे.सादीक यास अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. रावेर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक महेंद्र सुरवाडे, पोलिस कॉन्स्टेबल मंदार पाटील, सुरेश मेढे, प्रमोद पाटील, सुकेश तडवी, विशाल पाटील व कुणाल सोनवणे आदींनी ही कारवाई केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !