काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागातर्फे जागतीक अल्पसंख्यांक दिन उत्साहात
भुसावळ : जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने 18 डिसेंबर रोजी जागतीक अल्पसंख्यांक हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आल. अध्यक्षस्थानी माजी आमदार नीळकंठ फालक होते. अल्पसंख्यांक दिनानिमित्त शीख समाजाचे जगपालसिंह गील, जैन समाजाचे जे.बी.कोटेचा, बौद्ध समाजाचे भगवान मेढे, इसाई समाजाचे नोवेल डिसुझा, बोहरा समाजाचे डॉ.नईम मझहर, मुस्लिम समाजाच्या यास्मीन बानो यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात माजी आमदार नीळकंठ फालक, शहराध्यक्ष रवींद्र निकम, विलास खरात, डॉ.नईम मझहर यांनी मनोगत व्यक्त केले.
पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन
अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मो.मुन्वर खान यांनी अल्पसंख्यांक समाजासाठी काँग्रेस कमेटीतर्फे देण्यात आलेल्या योजनेच्या पुस्तिकेचे विमोचन माजी आमदार नीळकंठ फालक यांच्याहस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी शहराध्यक्ष रवींद्र निकम, अनुसूचित जाती विभागाचे समन्वयक भगवान मेढे, विलास खरात, संतोष साळवे, इस्तेहाक चौधरी, महेंद्र मसाले, सुखदेव सोनवणे, राणी खरात, हमीदा गवळी, युवक अध्यक्ष इम्रान खान, जॉनी गवळी, छोटू भाऊ, शैलेंद्र नन्नवरे, हमीद सर, किशोर जाधव, अॅड.ईम्रान, इम्रान ठेकेदार, मोहसीन, कादर व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष सलीम गवळी व तालुकाध्यक्ष अकील शाह यांनी केले. सूत्रसंचालन अल्पसंख्यांक विभागाचे शहर सचिव हमीद सर यांनी केले.

