डांभूर्णी शिवारात नवजात अर्भकाला सोडून माता पसार


यावल : तालुक्यातील डांभूर्णी शिवारातील नितीन फालक यांच्या गट क्रमांक 785 मधील शेतात एक दिवसीय पुरूष जातीचे अर्भक सापडल्याची घटना रविवारी दुपारी 12.30 वाजता घडली. मजुरांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती कळवल्यानंतर या अर्भकास यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. अनैतिक संबंधातून हे अर्भक जन्माला आल्याचा संशय आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, अधिपरीचारीका नीलिमा पाटील, वाय.डी.चौधरी आदींनी उपचार केले. संगोपनाच्या दृष्टीने या अर्भकास जळगावी हलवण्यात आले. रविवारी दुपारी लाल रंगाची साडी परीधान केलेली महिला व पुरुष दुचाकीने त्या ठिकाणी आल्याचे मजुरांनी सांगितल्याने पोलिसांकडून अज्ञात मातेचा शोध सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस पाटील किरण कचरे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार तपास करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !