आचारसंहितेमुळे रावेरचा लोकशाही दिन रद्द
रावेर : मार्च महिन्यात कोरोना व्हायसरचा प्रभाव वाढल्यापासून सर्वसाधारण जनतेचा हक्काचा दिवस असलेला लोकशाही दिन रद्द करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांनी या महिन्याच्या तिसर्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्याचा आदेश दिला होता परंतु आचारसंहितेमुळे आजचा लोकशाही दिन रद्द केल्याचे प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी सांगितले. मार्च महिन्यापासून कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढल्याने शासनाने लॉकडाऊन लावल्यानंतर संसर्ग टाळण्यासाठी लोकशाही दिन रद्द करण्यात येत होता. डिसेंबर महिन्यात मात्र जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व तहसीलदार यांना तिसर्या सोमवारी लोकशाही दिन व्हिडीओ क्रॉनफ्ररस द्वारे आयोजित करण्याचे आदेश दिले होते मात्र ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता जारी करण्यात आल्याने सोमवारचा लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याने जनतेतून काहीशी नाराजी व्यक्त होत.

