आगामी जि.प., महानगरपालिका व नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढणार
पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांची भुसावळातील पत्रकार परीषदेत घोषणा
भसाावळ : मोदी सरकारने जर शेतकर्यांवर होत असलेले अत्याचार थांबविले नाही तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे 1 जानेवारीपासून आत्मनिर्भर अत्याचार प्रतिकार अभियान राज्यभरात राबवले जाईल तसेच आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परीषद निवडणुकीमध्ये पीपल्स रीपब्लिकन पार्टी स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याची घोषणा पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी भुसावळात केली. तसेच या निवडणुकीमध्ये मित्रपक्ष सोबत आल्यास त्याबाबत आम्ही विचार करू, असे ही त्यांनी स्पष्ट केले. रविवार, 20 रोजी दुपारी पीआरपीच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्ताने शहरात आले असतांना येथील शासकीय विश्रमागृहावर आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
पत्रकार परीषदेला जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, उत्तर महाराष्ट्र युवा उध्यक्ष राकेश बग्गन, आरीफ शेख, अकिल शहा, चंदू पहेलवान, संतोष मेश्राम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री पद नसल्याची खंत
जोगेंद्र कवाडे म्हणाले की, काँग्रेस पक्षासोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची 1997 पासून युती आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. सत्तेमध्ये राष्ट्रवादी कँांग्रेस पार्टी पक्षाने मित्र पक्षांना सोबत घेऊन त्यांना त्यांचा वाटा दिला आहे. शिवसेनेने ही बच्चू कडू यांना पद दिले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापही पीआरपीच्या नेत्यांना कोणतेही मंत्रीपद देण्यात आले नाही. याचा आम्हाला राग नाही, मात्र खंत आहे. सत्तेमध्ये जो वाटा मिळाला पाहिजे तो अद्यापही आम्हाला मिळाला नाही, असेही कवाडे म्हणाले. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसने लाचारी सोडून सत्तेला लाथ मारून सत्तेबाहेर पडावे असे वक्तव्य सांगली येथे केले होते. त्याला प्रत्युत्तर देतांना प्रा.जोगेंद्र कवाडे म्हणाले की, सोनिया गांधी यांनी ठाकरे सरकारला अल्पसंख्यांक समाजाविषयी पत्र लिहून मानवता जोपासली असल्याचे प्रा.कवाडे म्हणाले.

