सावद्यात खंडेराव यात्रोत्सव रद्द : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ धार्मिक कार्यक्रम
सावदा : दरवर्षी सालाबादप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याच्या चंपाषष्ठीला होणारा खंडेराव महाराज यात्रोत्सव यंदा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आला तर केवळ मंदिरातील धार्मिक कार्यक्रम सोशल डिस्टन्सचे पालन करून पार पडले.
यात्रोत्सव रद्द : केवळ धार्मिक कार्यक्रम
भक्तगणांचे जागृत देवस्थान खंडेराव महाराज देवस्थान परीसरात मार्गशीर्ष महिन्याच्या चंपाषष्ठीला साजरा होतो मात्र यंदा कोरोना महामारीचे संकट प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत रविवारी यात्रोत्सव रद्द करण्यात आला तसेच बारागाड्या ओढण्याची परंपराही यंदा खंडित झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात सकाळी आरती, तळी भरणे आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. यंदा बारागाड्या ओढण्याची परंपरा खंडित झाल्याची माहिती खंडेराव देवस्थान संस्थांचे प्रमुख अशोक वसंत पवार व राहुल अशोक पवार यांनी दिली.


