भुसावळातील कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतवर ‘एमपीडीए’


एक वर्षांसाठी मध्यवर्ती कारागृहात रवानगी : अत्यंत गोपनीय पद्धत्तीने कारवाई : भुसावळात गुन्हेगारी वर्तुळात खळबळ

भुसावळ : पोलिस दप्तरी कुविख्यात म्हणून नोंद असलेला गुन्हेगार निखील सुरेश राजपूत (35, रा.श्रीराम नगर, भुसावळ) याच्यावर महाराष्ट्र प्रीव्हेंशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टीव्हीटी (एमपीडीए) कायद्यातील अधिनियम 1981 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून सोमवारी रात्री जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी या संदर्भातील आदेश काढले. आदेशाच्या अनुषंगाने संशयीताला दुपारपासून बाजारपेठ पोलिसांनी डिटेन केले होते. एक वर्षांसाठी आरोपीवर एम.पी.डी.ए. (स्थानबद्ध) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून रात्री उशिरा आरोपीला मध्यवर्ती कारागृहात हलवण्याची प्रक्रिया सुरू असल्याच्या वृत्ताला पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दुजोरा दिला.

गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ
भुसावळ गुन्हेगारीबाबत राज्यभरात बदनाम असून नूतन पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पदभार स्वीकारताच तीन महिन्यात गुन्हेगारीला आळा बसवणार असल्याचा शब्द भुसावळकरांना दिला आहे. त्यानुषंगाने परीणामही शहरात जाणवू लागले आहेत. भुसावळ पोलिसांच्या दप्तरी कुविख्यात म्हणून नोंद असलेल्या एका आरोपीवर सोमवारी कारवाई झाल्यानंतर भुसावळातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी या संदर्भात आरोपीवर कारवाई करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. दरम्यान, चार टोळ्यांच्या हद्दपारीबाबत पोलिस उपअधीक्षकांकडे सुनावणी सुरू आहे व यानुषंगानेदेखील लवकरच मोठी कारवाई होणार आहे शिवाय यापुढे एम.पी.डी.ए.अंतर्गत कुणा गुन्हेगारावर कारवाई होते? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !