रावेरची शांतता भंग करणार्‍यांवर लवकरच हद्दपारीची कारवाई


रावेर : रावेर शहराच्या शांततेला गालबोट लावणार्‍या उपद्रवींना निष्पन्न करण्यात आले असून लवकरच त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिस सूत्रांनी दिली. रावेर शहरात 1946 पासून दोन समाजात क्षुल्लक कारणावरून वारंवार दंगली घडल्याचा इतिहास आहे तर आतापर्यंत या संदर्भात तब्बल 64 दंगलीचे गुन्हे दाखल आहेत. काही विशिष्ट लोक दंगलीत सक्रिय असल्याचा अभ्यास पोलिसांनी आतापर्यंतच्या दंगलीदरम्यान केला आहे. 22 मार्च रोजी उसळलेल्या दंगलीनंतर एकूण 436 आरोपी अटक करण्यात आली होती तर यातील 39 आरोपींना अद्याप अटक प्रस्तावीत आहे. वॉण्टेड आरोपींच्या अटकेसाठी टीम तयार करण्यात आल्या असून शिवाय उपद्रवींचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्या हद्दपारीचे प्रस्तावही तयार करण्यात आले आहे. शहरातील दंगल प्रभावित भागांना अशांत क्षेत्र घोषित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे शिवाय दंगलत झालेल्या नुकसानीची भरपाई वसुलीची कारवाई अद्याप प्रस्तावीत आहे. पाच संशयीतांवर एम.पी.डी.ए. कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून त्यांची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

शांतता बिघडणार्‍यांची खैर नाही
शहराची शांतता भंग पावणार्‍या उपद्रवींवर पोलिसांची करडी नजर असून शहराची शांतता भंग करणार्‍यांवर लवकरच कारवाई झालेली दिसेल, असे पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !