अलायन्स मराठी चर्चमध्ये ख्रिसमसनिमित्त विविध कार्यक्रम
कोरोनाचे सावट : अनेक कार्यक्रमांना फाटा
भुसावळ : यंदा ख्रिस्त जन्मोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी येथील अलायंन्स मराठी चर्चमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करून गर्दी न करता विविध कार्यक्रमांचे आयोजन साध्या पद्धतीने करण्यात आले आहे.
21 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम
21 रोजी चर्च स्वच्छता तरूण संघाच्या सदस्यांनी केली तर 23 रोजी सायंकाळी 6 ते 8.30 वाजेपर्यंत कॅरल सिंगिंगचा कार्यक्रम झाला. 24 रोजी सायंकाळी 4 ते 6 वाजता व सायंकाळी सात वाजेपर्यंत खाऊ वाटप ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त होईल तसेच पूर्वसंध्येला विशेष उपासना तरूण संघ व चर्चचे सभासद तसेच पास्टर स्वप्निल नाशिककर करतील. 25 रोजी सकाळी 9 वाजता ख्रिस्त जन्मोत्सव विशेष उपासना प्रेमचंद जाधव करतील. 26 रोजी दुपारी 12 वाजता विविध खेळ व स्पर्धा चर्च परीसरात होतील. 27 रोजी सकाळी 9 व सायंकाळी सहा वाजता प्रभुवर विशेष उपकार स्तुती उपासना व संडे स्कूल कार्यक्रम पास्टर स्वप्नील नाशिककर अनिता खांडेकर, प्रतिभा वाघमारे, रीना सिंग, संगीता निर्मल या करतील. 28 रोजी सकाळी नऊ वाजता निबंध स्पर्धा, 29 रोजी सकाळी नऊ वाजता चित्रकला स्पर्धा, 30 रोजी सायंकाळी सात वाजता चर्च परीसरात स्नेहभोजन, 31 रोजी रात्री 9 वाजता भजन व वॉच नाईट सर्विस आयोजन चर्च परीसरात होईल. 1 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता नवीन वर्ष विशेष उपासना व प्रभु भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

समाजबांधवांना आवाहन
समाजबांधवांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन पास्टर स्वप्निल नाशिककर, चर्च अध्यक्ष प्रवीण मोहोळ, सेक्रेटरी फिलिप फ्रान्सिस, खजिनदार प्रेमचंद जाधव, पंच जया फ्रान्सीस मनी, प्रवीण जाधव, अनिता रवंदळेकर, प्रतिभा वाघमारे, संगीता निर्मल, रीना सिंग, सॅमसन गायकवाड, सुनील सिंह यांनी केले आहे.

