भुसावळ विभागात सायकल रॅलीचे आयोजन


भुसावळ : फिट इंडिया साइक्लोथॉन मंडळ क्रीडा अससोसिशनतर्फे गुरुवारी फिट इंडिया साइक्लोथॉनच्या थीमवर आधारीत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी रॅलीला हिरवी झेंडा दाखविला. रॅली क्रीडा ग्राउंड नंतर मंडळ रेल प्रबंधक कार्यालय, रेल्वे हॉस्पिटल, लिम्पस क्लब, ऑर्डनन्स फॅक्टरी आणि आरपीडीकडून मार्गक्रमण करीत पुन्हा क्रीडा ग्राउंडवर पोहोचली. रॅलीत सर्व शाखांचे अधिकारी आणि कर्मचारी, भुसावल स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !