भुसावळातील रेल्वे स्थानकासह यार्डावर आता ‘निंजा ड्रोन’ची नजर


भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकासह रेल्वेच्या यार्डावर आता ड्रोन कॅमेर्‍याची नजर राहणार असून या माध्यमातून अप्रिय घटनांना आळा घालण्यास मदत होणार आहे. सोमवारी डीआरएम विवेककुमार गुप्ता व रेल्वे सुरक्षा बलाचे मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितीज गुरव यांच्या प्रयत्त्नाने निंजा सर्विलास ड्रोन कॅमेरा भुसावळ रेल्वे सुरक्षा बलासाठी खरेदी करण्यात आला.

दोन किलोमीटर अंतरापर्यंत नजर
निंजा ड्रोन कॅमेरा हा एक सिंगल टच ऑपरेशन, व्हर्टिकल टेक ऑफ लँडिंग ऑपेरेशनची क्षमता असून किमान दोन किलोपर्यंत या कॅमेर्‍याच्या माध्यमातून नजर राखता येणार आहे. 200 मीटर उंचीसह 0 डिग्री सेल्सियस ते 50 डिग्री सेल्सियसमध्ये ड्रोन कार्यरत राहणार आहे. ड्रोन वापरण्यासंदर्भात आरपीएफ कर्मचार्‍यांना तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !