थंडीत कुडकुडणार्या गरजवंतांना पांघरली मायेची शाल
स्व. स्वप्नील ललवाणी स्मृतीप्रित्यर्थ ज्ञानासह मनोरंजन गु्रपच्या सहकार्याने प्रा. दिलीप ललवाणी यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
भुसावळ : शहरातील सार्वजनिक जागी रात्रीच्या सुमारास अंगावर पांघरण्यासाठी काहीही नसल्यामुळे थंडीत कुडकुडणार्या गरजवंतांना मायेची शाल पांघरून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम ज्ञानासह मनोरंजन गु्रपच्या सहकार्याने प्रा. दिलीप ललवाणी यांनी केले.
स्मृतीप्रीत्यर्थ राबवला उपक्रम
प्रा.दिलीप ललवाणी यांचे चिरंजीव स्व.स्वप्निल ललवाणी यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून स्मृतीप्रीत्यर्थ हा उपक्रम घेण्यात आला. भुसावळ येथील जामनेर रोडलगत असलेल्या श्री अष्टभुजा देवी मंदिर येथून उपक्रमास सुरुवात करण्यात आली. शिक्षण तज्ञ प्र.ह. दलाल यांच्या हस्ते एका लहान अनाथ बालकाला शाल पांघरून मायेची ऊब देण्यात आली. यावेळी नलीन ललवाणी, हरी पाटील, सुनील हेडा, नितीन छेडा, वसंत सोनवणे, संजय ताडेकर, कैलास तांबट, नाना पाटील, प्रशांत ढाके, डी.के. पाटील, प्रदीप सोनवणे, अशोक तायडे, योगेश इंगळे, बी. बी. जोगी, प्रविण गांधेले, श्रीकांत जोशी, तन्मय जोशी, अमितकुमार पाटील, भूषण झोपे, दीपक आमोदकर यांच्यासह ज्ञानासह मनोरंजन ग्रु्रपप्रमुख डॉ. जगदीश पाटील उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित सर्वांनी आपापल्या वाहनांनी छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स, बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन परिसर, महात्मा गांधी पुतळा परिसर, वसंत टॉकीज परिसर यासह शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी जाऊन थंडीने कुडकुडणार्या गरजवंतांना मायेची शाल पांघरली. हा उपक्रम रात्री दहा ते अकरा वाजेदरम्यान घेण्यात आला. थंडीने कुडकुडत असताना एकाएकी आलेल्या स्वयंसेवकांनी अंगावर शाल पांघरल्याने गरजवंतांच्या चेहर्यावर समाधान दिसत होते. गेल्या दोन दिवसापासून थंडी वाढल्याने उघड्यावर झोपणार्या गरजवंतांसाठी या शाली म्हणजे थंडीपासून बचाव करण्यासोबतच शारीरिक व मानसिक ऊब देणार्या ठरल्या. एकाएकी रात्रीच्या सुमारास घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे त्या त्या स्थळी उपस्थित असणार्या शहरवासियांनी कौतुक केले आणि हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याच्या प्रतिक्रियादेखील व्यक्त केल्या.


