भुसावळच्या तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
भुसावळ : अज्ञात वाहनाच्या धडकेत 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावरील गणेश बोअरींग सेंटरजवळ बुधवारी रात्री 9.30 वाजता हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार निरंजन दत्त्त्तू बोंडे (20, चक्रधर नगर, भुसावळ) या तरुणाचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

