रावेरात काँग्रेस व सेवा दलातर्फे रक्तदान शिबिर


रावेर : रावेर तालुका काँग्रेस कमिटी व रावेर सेवादल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. रावेर सेवादल काँग्रेस तर्फे सेवादल जोडी अभियानातंर्गत आयोजित मेळाव्यात 150 नवीन कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. अध्यक्षस्थानी अ‍ॅड.संदीपभैय्या पाटील होते. आमदार शिरीष चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर : अ‍ॅड.संदीप पाटील
अ‍ॅड.संदीप पाटील म्हणाले की, यांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुका या काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जास्तीत-जास्त प्रमाणावर लढण्यात येणार असून कार्यकर्त्यांनी जोमाने त्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी आमदार चौधरी यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल.


यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, महिला जिल्हा उपाध्यक्ष कांता बोरा, राजीव सवर्णे, विनायक महाजन, योगेश गजरे, प्रतिभा मोरे, महिला तालुकाध्यक्ष मनिषा पाचपांडे, सेवादलचे जळगाव महानगर प्रमुख कैलास महाजन, डॉ.सुरेश पाटील, अय्युब मेंबर, मिलिंद पाटील, दिलरूबाब तडवी, आसिफ मेंबर, संतोष पाटील आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी भरत कुंवर, रमेश कदम, प्रतिक खराले, जफरउल्ला खान, जावेद तडवी, संदीप लहासे, रामदास लहासे, प्रशांत सवर्णे यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन मानसी पवार तर आभार योगेश गजरे यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !