कुशी नगर एक्स्प्रेसमधून बॅग लंपास लंपास


भुसावळ : महिला प्रवाशाची गोरखपूर-कुशीनगर एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी बॅग लांबवली. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता ही घटना घडली असून या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 01015 डाऊन गोरखपूर-कुशीनगर एक्स्प्रेसच्या बी-3 या डब्यातील बर्थ एकवर बसून प्रवास करीत असलेले सूर्यनारायण मौर्या (रा.देवीनगर, जि, गौड, उत्तर प्रदेश) यांच्या झोपेचा फायदा घेत चोरट्यांनी बॅग लांबवली. या बॅगेत 20 हजार रुपये रोख, 11 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व एक सोन्याची चेन असा सुमारे 41 हजार रुपयांचा ऐवज होता. भुसावळ रेल्वे स्थानक आल्यावर मौर्या याच्या चोरीचा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी फिर्यादी मौर्या यांनी औरंगाबादला जीआरपी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर तो भुसावळात शुक्रवारी वर्ग करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !