दोन टक्के सुरक्षा अनामत न घेताच कंत्राटदाराला कार्यादेश


मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार

मुक्ताईनगर : माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील कच्चा-पक्क्या नाल्यांची साफसफाई करण्याचे कंत्राट जानेवारी 2020 मध्ये गंगापूर (औरंगाबाद) येथील सृष्टी इंटरप्राईजेस या मक्तेदाराला देण्यात आले आहे. निविदा भरतेवेळी एक टक्का सुरक्षा अनामत व काम मिळाल्यानंतर कार्यादेश स्वीकारण्यात आधी दोन टक्के सुरक्षा अनामत भरावी लागते, मात्र सदर मक्तेदाराकडून वाढीव दोन टक्के सुरक्षा अनामत न घेताच त्याला कार्यादेश देण्यात आला. या संदर्भात नागरीक गिरीश चौधरी यांना 4 डिसेंबर रोजी देण्यात आलेल्या माहिती अधिकारातील मिळालेल्या माहितीवरून ही बाब निदर्शनास आली.

मक्तेदारासाठी सोयीसाठी दिली मुभा
चौधरी यांनी 7 डिसेंबर रोजी संबंधित जन माहिती अधिकारी तथा अभियंता पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, नगरपंचायत मुक्ताईनगर यांना लेखी पत्र देऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली मात्र नगरपंचायत प्रशासनाने मक्तेदाराचे तदनंतर सुद्धा नोव्हेंबर महिन्याचे बिल अदा केले. चौधरी यांना वाढीव सुरक्षा अनामत बिलातून टप्प्याटप्प्याने कपात करत असल्याचे उत्तर मिळाले. सुरक्षा अनामत एक रकमी न देता बारा महिन्यांमध्ये मक्तेदाराच्या सवलती नुसार/ सोयीनुसार का स्वीकारण्यात येत आहे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शिवाय नगरपंचायतीच्या इतिहासात आजपर्यंत कुठल्याही मक्तेदाराराला अशी सवलत देण्यात आली नाही मग याच मतदाराला प्रशासन का ही सवलत देत आहे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !