आंतरराष्ट्रीय आउटस्टँडिंग लेक्चरर अवॉर्डने डॉ.भाग्यश्री भंगाळेंचा गौरव
भुसावळ : भुसावळ कला, विज्ञान, नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.डॉ.भाग्यश्री शैलेंद्रकुमार भंगाळे यांना इंटरनॅशनल एज्युकेशन सिम्पोसियम अँड अवार्ड्स अंतर्गत आउट स्टँडिंग लेक्चरर अवार्ड 2020 या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी वर्च्युअल घेण्यात आला. हापुरस्कार हा जॉर्ज सालझार (जॉन्सन स्पेस रीसर्च सेंटर नासा यु.एस.ए.) आणि डॉ.इसाबेल पेडारझा (वैज्ञानिक सी.ई.आर.एन., स्विझरलँड) यांच्याहस्ते व इडी गोनझाल्स, नासा स्टीम इनोवेशन तसेच सौरभ कौशल, राघव शर्मा, सचिन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी दोन हजारांपेक्षा जास्त लोकांमधून 105 जणांची निवड करण्यात आली.
अभिनंदनाचा वर्षाव
या पुरस्काराबद्दल प्रा.डॉ.भाग्यश्री शैलेंद्रकुमार भंगाळे यांचे ताप्ती एज्युकेशनल सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य शैलेश पाटील व इतर सर्व प्राध्यापक वृंदांनी अभिनंदन केले आहे.


