सावद्यात सात लाखांचा तंबाखू जप्त : एकाला अटक


सावदा : सावदा-फैजपूर ररस्त्यावर सावदा पोलिसांनी एक ट्रकमधून सुमारे सहा लाख 72 हजारांचा बंदी असलेला तंबाखू व ट्रक असा सुमारे 10 लाखाचा मुद्दे माल जप्त केला. याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी जळगाव यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून एक संशयीत पसार झाला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
सावदा येथील सावदा-फैजपूर रोडवरील डायमंड तोल काट्यासमोर सार्वजनिक जागी 25 रोजी सकाळी 9.30 वाजे दरम्यान ट्रक (एम.पी. 09 के.सी.6897) हा उभा असताना यात संशयास्पदरीत्या माल असल्याचा संशय आल्याने त्यास सावदा पोलिस स्टेशनला आणल्यावर तपासणी केली असता त्यात विक्रीस परवानगी नसलेला मिराज तंबाखू आढळला. यानंतर अन्नसुरक्षा अधिकारी जळगाव यांना माहिती कळविण्यात आली, अन्नसुरक्षा अधिकारी जळगाव यांनी सावदा येथे आल्यावर तपासणी केली. सदरचा पदार्थ हा राज्यात उत्पादन, निर्मिती, साठवण, वाहतूक, व विक्रीस प्रतिबंध असताना त्याची वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आल्याने सदर ट्रक चालक व सोबत असलेला या दोघांवर सावदा पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चालक निर्मल मिलन सोलंखी हा पसार झाला तर त्याचा साथीदार कमल सुभान मन्सुरे यास अटक करण्यात आल. दोन्ही आरोपी बागफल, ता.बडवा, जि.खरगोन, मध्यप्रदेश येथील रहिवासी आहेत. तपास सहाय्यक निरीक्षक स्वप्नील उनवण, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आर.डी,पवार, संजय चौधरी करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !