भोसरी भूखंड प्रकरण : माजी मंत्री खडसेंना ईडीची नोटीस


मुंबई : भोसरी भूखंड प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली असून ती आपल्याला प्राप्त झाल्याच्या वृत्ताला खडसे यांनी दुजोरा दिला आहे. शुक्रवारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने नोटीस पाठवली असून ईडीने त्यांना चौकशीसाठी 30 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देतांना एकनाथराव खडसे यांनी आपल्याला ही नोटीस मिळालेली नसल्याचे स्पष्ट केले होते. आपल्याला जेव्हा नोटीस मिळेल तेव्हाच आपण या प्रकरणी बोलू असे ते म्हणाले होते. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी दुपारी एकनाथराव खडसे यांनी आपल्याला ईडीची नोटीस मिळाल्याची माहिती दिली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !