लोढा यांचा राष्ट्रवादीशी संबंध नाही : अ‍ॅड.रवींद्र पाटील


जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टिका करणारे प्रफुल्ल लोढा राष्ट्रवादीचे असल्याचा दावा करत असलेतरी ते पक्षाचे सदस्यही नाहीत, त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

…तर लोढा यांनी जाहीर करावे
अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मुंबई, पुण्यात भेटी घेतात. त्याचे फोटो प्रसिद्ध करून आम्ही पक्षाचे असल्याचा दावा करतात, असे सांगून ते म्हणाले की, सर्वसामान्यांना नेते भेटत असतात. परंतु काही जण या भेटीचा गैरफायदा घेवून आपण पक्षाचे पदाधिकारी असल्याचा दावा करीत असतात. त्यामुळे आपण पक्षाच्या नेत्यांची नागरीकांनी भेट घेतली असेल तर जिल्हाध्यक्ष, जिल्हा महानगराध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्या परवानगीनेच आपण पक्षाचे सदस्य व पदाधिकारी असल्याचे जाहीर करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !