यावलमध्ये हायमास्ट पथदिवे बंद असल्याने गैरसोय


मुख्याधिकार्‍यांना आयशानगर व खिर्णीपुरा परीसरात युवकांचे निवेदन

यावल : नगरपरीषदेच्या कार्यक्षेत्रातील हायमास्ट पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने या प्रकारामुळे प्रभाग क्रमांक तीनमधील आयशानगर व खिर्णिपुरा परीसरातील नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे. या प्रश्नाकडे मुख्याधिकारी यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आयशानगरमधील काही समाजसेवी युवकांकडून एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

मुख्याधिकार्‍यांना निवेदन
यावल नगरपरीषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातून व निधीतुन यावल नगरपरीषदेच्या कार्यक्षेत्रातील आयशानगरातील फातेमा मस्जिदजवळ तथा भुसावळ टी पांईट तसेच खिरनीपुरा बुरुज चौक या सार्वजनिक ठिकाणच्या परीसरातीलदेखील असलेले हायमास्ट पथदिवे मागील आठ महिन्यांपासून बंदावस्थेत आहे. पालिकेकडे तक्रार केल्यानंतर दखल घेतली जात नसल्याने आयशा नगरातील समाजसेवी अशपाक शाह, हाजी गफ्फारशाह, नजीब शेख, उमरे खान, शेख नदीम, राजीक रमीज पटेल, शेख सलीम टेलर, इमरान शेख पहेलवान यांच्यासह काही युवकांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !