माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल
जळगाव : मविप्र संचालक अॅड. विजय भास्कर पाटील यांना धमकावून खंडणी वसुल केल्याप्रकरणी माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मविप्र वादात भोईटे गटाला मदत करून आमदार महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अॅड.विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलिसात केल्यानंतर गुन्हा दाखल होवून तो पुण्यातील कोथरूड पोलिस स्थानकात वर्ग करण्यात आला होता.
पाच लाखांची उकळली खंडणी
अॅड.विजय भास्कर पाटील यांच्या तक्रारीनुसार जळगाव येथील मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्था जळगावचे संचालक असून संशयीत आरोपींनी पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावल्यानंतर शिविगाळ करत दमदाटी करण्यात आली तसेच सदाशीव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर मारहाण करीत गळ्याला आणि पोटाला चाकू लावून सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी घेतली उकळल्याचा आरोप करण्यात आला होता. जानेवारी 2018 ते जानेवारी 2021 या कालावधीत ही घटना घडली मात्र उशिराने निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येवून तो पुण्यात वर्ग करण्यात आला.


29 संशयीतांविरोधात कोथरूडमध्ये गुन्हा दाखल
अॅड.विजय भास्कर पाटील यांच्या तक्रारीवरून तानाजी केशव भोईटे (ए-1/ ए 1001 माणिकचंद, मलबार, कोंढवा, पुणे), निलेश रणजीत भोईटे (रा. पुणे), वीरेंद्र रमेश भोईटे (भोईटे नगर, जळगाव), अलका संतोष पवार (हाउसिंग सोसायटी, जळगाव), सुषमा गुलाबराव इंगळे (शिवाजीनगर, मु. पो.तालुका, यावल,जि.जळगाव), विजया धर्मराज यादव (आर.के.नगर, मू. पो.ता.अमळनेर, जि.जळगाव), जयंत फकीरराव देशमुख (हत्ती बिल्डिंग, देशमुख गल्ली, मु.पो.ता.चाळीसगाव), निळकंठ शंकर काटकर (रा. नगरदेवळा, ता.जळगाव), जयवंत पांडुरंग येवले (रा.शिवाजी नगर, मु. पो.ता.यावल, जि.जळगाव), परमानंद दंगल साठे (चिंचोली, ता.यावल), भगवंतराव जगतराव देशमुख (वरणगाव, ता.भुसावळ), गोकुळ पितांबर पाटील (रा.भादली, पो.कठोरा, ता.जि.जळगाव), शंकरराव माणिकराव शिंदे (रा.तरसोद, ता.जि.जळगाव), सुभाष रामचंद्र पाटील (पिंप्री बु.॥, ता.एरंडोल, जि.जळगाव), सुनील भाऊसाहेब भोईटे (रा.संभाजी पेठ, मु.पो. ता.यावल, जि.जळगाव), कुंडलिक यादव पाटील (कामतवाडी, ता.अमळनेर, जि.जळगाव), एकनाथ फत्तु पाटील (मोरगाव, ता.रावेर, जि.जळगाव), किशोर जयवंतराव काळे (रा.हनुमान कॉलनी, जळगाव) बाळू गुलाबराव शिर्के (रा.बोरावल, गेट, मु.पो.ता.जि.जळगाव), जयवंत बाबुराव भोईटे (विठ्ठल पार्क, मुक्ताईनगर, जळगाव), शिवाजी त्र्यंबकराव घुले (रा.कळमसरे, ता.पाचोरा, जि.जळगाव), पितांबर शेनफळू पाटील (रा.मानराज पार्क, जळगाव), शीला मधुकर मराठे (रा.रवंजे, बु.॥, ता.एरंडोल, जि.जळगाव), महेंद्र वसंतराव भोईटे (रा.कोल्हे नगर, जळगाव), निलेश भोईटे यांचा हस्तक सुनील गायकवाड, शिवाजी केशव भोईटे (पुणे), सुनील देवकीनंदन झंवर (रा.जळगाव), गिरीश दत्तात्रय महाजन (रा.जामनेर), रामेश्वर नाईक (रा.मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
