जळगावात व्हिडिओ व्हायरलच्या धमकीने 30 वर्षीय तरुणीवर अत्याचार
जळगाव (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : इंजेक्शन देत असल्याचा खोटा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत जळगावातील 30 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पीडीतेने एमआयडीसी पोलिसात धाव घेतल्यावरून 28 वर्षीय तरुणाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ताबीश रजा सैय्यद (28, मास्टर कॉलनी, जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.
असे आहे प्रकरण
जळगावातील एका भागातील 30 वर्षीय तरुणी टीवायबीएचे शिक्षण घेतले. सुमारे दिड वर्षांपूर्वी 24 एप्रिल 2025 पासून 5 ऑक्टोबर 2026 पासून वेळोवेळी चार महिन्यांपर्यंत पीडीतेचा खोटे इंजेक्शन देण्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपीने देत तिच्यावर दबाव आणून वेळोवेळी अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. अत्याचार करू देण्यास नकार दिल्यानंतर पीडीतेला आरोपीने ठार मारण्याची धमकी देत दुसरीकडे लग्न जमवल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील करीत आहेत.


