राष्ट्रपिता महात्मा गांधीचे विचार जगाला मार्गदर्शन करणारे : प्रा.डॉ.दिनेश महाजन


भालोद, ता.यावल (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : राष्ट्रपिता महात्मा गांधीनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत पहिल्यांदा सत्य, अहिंसा व सत्याग्रह या अस्त्रांचा प्रभावी वापर केला, तोही बलाढ्य अशा ब्रिटिश साम्राज्या विरोधात. अशा पध्दतीच्या आंदोलनातून त्यांनी असहकार, सविनय कायदेभंग, छोडो भारत या मार्गाने ज्या देशाच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता अशा साम्राज्याला हादरवून सोडले व त्यांना झुकवले. त्यांचे विचार जगाला मार्गदर्शन करणारे असल्याचे विचार येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश महाजन यांनी व्यक्त केले. कला, विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.के.एस.पाटील यांनी केले. याप्रसंगी कल्याण चौधरी, बाळकृष्ण चौधरी, तुळशिराम चौधरी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !