जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 52 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 56 हजार 277 वर : एकाच दिवसात 50 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात एक रुग्णाचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 52 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1337 रुग्णांचा मृत्यू ओढवला तर गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 56 हजार 277 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 54 हजार 446 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर शनिवारी एकाच दिवसात 50 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

शनिवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 14
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 14
अमळनेर 02
चोपडा 14
पाचोरा 02
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 00
एरंडोल 01
जामनेर 01
रावेर 01
पारोळा 00
चाळीसगाव 02
मुक्ताईनगर 00
बोदवड 01
अन्य जिल्हा 00


24 तासात एका रुग्णाचा मृत्यू
गेल्या 24 तासात डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहरातील 42 वर्षीय पुरूषाचा मयतात समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !