साने गुरूजी नगरातील रहिवासी रस्त्यांसह गटारींच्या सुविधांपासून वंचित
रस्त्यांसह गटारींचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत पालिका प्रशासनाला निवेदन
भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये येणार्या साने गुरूजी नगरातील रहिवाशांना गटारी नसल्याने तसेच तब्बल 25 वर्षांपासून रस्ते नसल्याने असुविधांचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असतानाही पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी बेदखल असल्याने स्थानिक नागरीकांनी नुकतेच पालिका प्रशासनाला निवेदन देवून समस्या सोडवण्याची अपेक्षा व्यक्त केली.
गटारी नसल्याने सांडपाणी उघड्यावर
निवेदनाचा आशय असा की, प्रभागात पक्के रस्ते नसल्याने नागरीकांना पावसाळ्यात प्रचंड मनस्ताप सोसावा लागतो शिवाय घरे जमिन लेव्हलपासून खाली गेली असून गटारींअभावी सांडपाणी उघड्यावर येत असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगराध्यक्ष तसेच नगरसेवक व पालिका प्रशासनाने गांभीर्याने या समस्यांची दखल घ्यावी, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली. निवेदन देताना हेमंत पाठक, चेतन धाबे, मयूर अंजाळेकर, रघुनाथ कान्हे, विजय लोधी, मनीष जगताप, प्रथमेश बाणाईत, सुजय साळुंखे यांच्यासह प्रभागातील नागरीक उपस्थित होते.


