विषारी द्रव प्राशनाने अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
यावल : घरगुती भांडणातून संतापाच्या भरात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री तालुक्यातील हरीपुरा गावाजवळील पांढर्या वस्तीत घडली. तरुणीवर तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जळगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले. हरीपुराजवळ असलेल्या पांढरी वस्ती येथील रहिवासी ममता काशीराम पावरा या मुलीने शुक्रवारी सायंकाळी घरात असलेले विषारी द्रव प्राशन केले. हा प्रकार कुटुंबाच्या लक्षात येताच तिला तातडीने यावल येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांकरीता दाखल केले या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, परीचारीका नीलिमा पाटील, पिंटू बागुल आदींनी प्रथमोपचार केले. तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

