भुसावळत पालिकेच्या वैद्यकीय अधिकार्यांना कोरोना
भुसावळ : शहरात कोरोना फैलाव कायम असून नगरपालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांच्यासह त्यांच्या दोन मुलींचे अहवाल शुक्रवारी पॉझीटीव्ह आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. यासोबतच शहरातील आणखी एक डॉक्टरांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी शहरातील दोन रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले तर 12 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरासह ग्रामीण भागात आतापर्यंत चार हजार 441 रुग्ण बाधीत झाले. त्यातील चार हजार 218 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 37 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात 186 जणांचा मृत्यू झाला आहे.

