आरक्षण तिकीट परतावा देण्याची मुदत वाढवली
भुसावळ : 21 मार्च ते 31 जुलै या काळातील रेल्वे तिकीटे रद्द करण्यासाठी तसेच आरक्षण खिडकीवरून परतावा मिळवण्याची मुदत रेल्वे प्रशासनाने वाढवली आहे. नियमित वेळापत्रकातील रद्द केलेल्या गाड्यांसाठी हा नियम लागू आहे. 21 मार्च ते 31 जुलै या काळात आरक्षित केलेली तिकीटे रद्द करण्यासाठी तसेच आरक्षण तिकीट खिडकीवरून परतावा मिळवण्याची मर्यादा यापूर्वी सहा महिने होती. ती आता वाढवून नऊ महिन्यांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक प्रवाशांनी आपली मूळ तिकिटे रेल्वेच्या दावा कार्यालयात आयडीआर किंवा साध्या अर्जासहित जमा केली असतील. अशा प्रवाशांना परतावा देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

